Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथे मनरेगा बचाव अभियानाअंतर्गत काँग्रेसच्या वतीने निदर्शने व निषेध आंदोलन..

कुरखेडा येथे मनरेगा बचाव अभियानाअंतर्गत काँग्रेसच्या वतीने निदर्शने व निषेध आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-केंद्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावात तसेच योजनेत बदल केल्याने कोट्यवधी ग्रामीण कष्टकरी मजूरांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे.रोजगार हमी योजनेला कायद्याचे स्वरूप प्राप्त असतांनाच केंद्राने त्यात बदल करून कायदाच मोडीत काढला आणि रोजगाराच्या हमीवर गदा आणली.यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात आज,शुक्रवार १३ फेब्रुवारीला कुरखेडा शहराच्या फव्वारा चौकात तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने व निषेध करीत तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
भाजप शासनाच्या या जनविरोधी,शेतकरी,मजूर विरोधी निर्णयाचा निषेध करतांना कांग्रेस पक्षाचे  पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मोठी घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजना पूर्व स्वरूपातच देशात लागू ठेवत ग्रामीण जनतेला हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ कायदा अंमलात आणला गेला, तेव्हापासून कोट्यवधी ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देण्यात आली.मात्र,सध्याच्या सरकारने रोजगाराची हमी न देता केवळ पोकळ आश्वासने देण्याचा फंडा चालवला असल्याचे दिसून येत आहे.यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.आजच्या निषेध आंदोलनात कुरखेडा कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी,माजी सभापती गिरीधर तितराम, महिला कांग्रेस तालुका अध्यक्ष आशा तूलावी, नगरसेविका हेमलता नंदेश्वर,कूंदा तितिरमारे,आशा कूमरे,जयश्री धाबेकर,संध्या नैताम,आनंदराव जांभूळकर,तूकाराम मारगाये,दामोधर वट्टी,संजय कोकोडे,राजू बावनथडे, धरमदास उईके,उस्मान खान,भावेश मुंगणकर,युवक काँग्रेस अध्यक्ष प्राजंल धाबेकर,निलकंठ कोराम,चिरकूटा नैताम,हेमंत नरोटे,भिमराव टेंभुर्णे,मयुर टेंभुर्णे,सरपंच मंजूळा मारगाये,मूखरू टेकाम,उद्धव कापगते,निलकंठ आलाम,दादाजी आळे,अखरसिंग खडाधार,हेमंत नाकाडे, संदेश कोटागंले,प्रकाश सरदार,पूष्पलता सोरते,संगीता मडावी,शशीकला कूमरे तसेच मोठ्या संख्येने कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!