Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीराज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर गेले पद्मश्री डॉ.प्रकाश आमटेंच्या भेटीला..

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर गेले पद्मश्री डॉ.प्रकाश आमटेंच्या भेटीला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज,शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी भामरागड तालुक्याच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पांतर्गत रुग्णालय,निवासी आश्रमशाळा आणि आदिवासी भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.
यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यानंतर इतक्या दुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागात सेवा देण्याची प्रेरणा कशी मिळाली, अशी विचारणा डॉ.आमटे यांना केली.त्यावर उत्तर देतांना डॉ.आमटे यांनी सांगितले की,गेली तब्बल ५२ वर्षे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी समाजाला आरोग्य,शिक्षण व मानवतावादी सेवा देण्याचे कार्य सुरू आहे.प्रारंभीच्या २२ वर्षांत या भागात वीज सुविधा देखील उपलब्ध नव्हती,तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवा अखंडपणे सुरू ठेवली,असे त्यांनी नमूद केले.
प्रकल्पामध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जातात कां,तसेच शासनाकडून आणखी कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे, याबाबत मंत्री आबिटकर यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्पदंशावरील औषधोपचारासाठी विशेष सवलत व अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा डॉ.आमटे यांनी व्यक्त केली. भामरागड परिसरात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने या संदर्भातील औषधे व उपचार व्यवस्थेला अधिक बळ देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या भेटीत डॉ.प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे तसेच लोकबिरादरी प्रकल्पातील सदस्यांशी संवाद साधण्यात आला.स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील अडचणी,दुर्गम भागातील रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा,तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्थानिक नागरिकांची आरोग्यविषयक निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर आरोग्य मंत्र्यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालय व अहेरी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा,रुग्णसेवा,उपलब्ध मनुष्यबळ आणि औषधसाठ्याचा आढावा घेतला.दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य विभागाचे संचालक डॉ.विजय कंदेवाड, सहसंचालक रामजी आडकीकर, उपविभागीय अधिकारी अमर राऊत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!