Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं; त्यांच्यावर कारवाई होईल- संजय राऊत

चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं; त्यांच्यावर कारवाई होईल- संजय राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.शेवटच्या घटकापर्यंत आमचाच अमुक होईल, आमचाच तमुक होईल म्हणणाऱ्यांना चंद्रपूर महानगरपालिकेत जोरदार शॉक बसला आहे.यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे,चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने भाजपला अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला आहे. त्यामुळे,भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या.तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत.महत्वाचे म्हणजे,एकूण ६६ नगरसेवक असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक,काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे ३,भाजपचे २३,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे २,बसपा १,शिवसेना शिंदे गट १,अपक्ष २ व एमआयएम १ इत्यादी नगरसेवक निवडून आले होते.सर्वात जास्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असल्याने काँग्रेचा महापौर बनेल,अशी अनेकांची मनधारणा झाली होती.मात्र,राजकारणाची सूत्रे वेगळीच जुळल्याने गणित फिस्कटला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.अश्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की,चंद्रपूरच्या घटनेचे पक्षातून कुणीही समर्थन केले नाही.भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेसाठी जाण्याची पक्षाची भूमिका नाही.मुंबईच्या महापौर संदर्भात भूमिका घेतली आणि ती जाहीरपणे घेतली.पण,चंद्रपूरमध्ये काही भूमिका घेतली असेल तर पक्ष त्याची दखल घेईल, परभणी महापालिकेमध्ये काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्याने आभार मानतो,पण चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल.चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही.त्याचे आम्ही समर्थन करत नाही.स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!