Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीआता गडचिरोलीत वंचित घटकांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी अभिनव पायलट प्रकल्प..

आता गडचिरोलीत वंचित घटकांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी अभिनव पायलट प्रकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वंचित घटकांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी एक अभिनव पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे.या अंतर्गत गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि प्रोजेक्ट डीप(वन स्टेप फॉरवर्ड फाउंडेशन)यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तर डीपचे सह-संस्थापक मुजामिल बैग यांनी करारावर स्वाक्षरी केली.
या पायलट प्रकल्पांतर्गत पात्र व वंचित कुटुंबांना अटीविरहित व न परतफेडीच्या स्वरूपातील एकरकमी रोख रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.या उपक्रमाचा उद्देश असा आहे की,लाभार्थी विशेषतः महिलांनी हा निधी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपजीविकेची साधने,लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय,घरकुल सुरक्षितता आदींसाठी वापरून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी.
परंपरागत कल्याणकारी योजनांमध्ये मासिक अनुदानांवर भर दिला जातो; मात्र या प्रकल्पात “रूपांतरकारी गुंतवणूक” या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे.एकरकमी लक्षणीय निधी उपलब्ध झाल्यास कुटुंबांच्या आर्थिक प्रवासात मूलभूत बदल घडू शकतो आणि महिलांचे कुटुंबातील निर्णयक्षम स्थान अधिक बळकट होऊ शकते,हा या प्रयोगामागील प्रमुख विचार आहे.या सहकार्याद्वारे गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा तळागाळातील अनुभव आणि रोख हस्तांतरण योजनांच्या रचना व मूल्यमापन क्षेत्रातील प्रोजेक्ट डीपचे तज्ज्ञत्व एकत्र येत आहे.तीन वर्षांच्या कालावधीत वैयक्तिक सर्वेक्षणे आणि गट चर्चांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा दारिद्र्य निर्मूलन व सामाजिक-आर्थिक उन्नतीवर होणारा दीर्घकालीन परिणाम अभ्यासला जाणार आहे.
या पायलटमधून निर्माण होणारी पुराव्याधारित माहिती भविष्यातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कल्याणकारी धोरणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.राज्य शासनाला संशोधनाधारित धोरण सहाय्य प्रदान करणाऱ्या प्रोजेक्ट डीपचे सह-संस्थापक मुजामिल बैग यांनी सांगितले की, “जगण्यापुरत्या सहाय्यापासून गुंतवणूककेंद्री दृष्टिकोनाकडे वळून आपण नागरिकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा मॉडेल उभारत आहोत.हा पुराव्याधारित दृष्टिकोन भविष्यातील कल्याणकारी धोरणांसाठी आदर्श ठरू शकतो.” तीन वर्षांच्या या भागीदारीमुळे निधीचा परिणाम केवळ तात्काळ खर्चापुरता मर्यादित न राहता, गडचिरोलीतील कुटुंबांच्या जीवनमानात शाश्वत व सकारात्मक बदल घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!