Saturday, August 29, 2026
Homeबीडपोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड:-राज्याच्या विविध भागात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.अश्याच प्रकारे बीड जिल्हा पोलीस दलाच्या १७४ जागांसाठी आज,बुधवार ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दीपक भास्कर वावळ वय २६ वर्षे,रा.ता.परळी,जि.बीड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सध्या बीडमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.आज बुधवारी पहाटे ५ वाजेपासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धामधूम सुरू होती.दीपकने दुपारी साडेबाराच्या सुमारास १६०० मीटर धावण्याची शारीरिक चाचणी पूर्ण केली.मात्र,धाव पूर्ण होताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय पथकाने तातडीने दीपकला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली.रुग्णालयात पोहचताच तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी होता.पोलिस भरतीसाठी तो बीडमध्ये आला होता.दीपक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता.आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी आणि देशसेवेसाठी त्याने हे ध्येय समोर ठेवले होते.मैदानावर तो आत्मविश्वासाने उतरला होता,मात्र धाव संपल्यानंतर त्याच्या आयुष्याची शर्यतच संपल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!