Saturday, May 23, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम.. - नगराध्यक्षांसह नगर सेवकांच्या हातात झाडू..

देसाईगंज नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम.. – नगराध्यक्षांसह नगर सेवकांच्या हातात झाडू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या,सोमवार २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हरीभक्त पारायण श्री सुनिल गुरनुले महाराज यांचा संगितमय श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान,दररोज हरीपाठ, भारूड,शिव शोभायात्रा व हवनाचे कार्यक्रम होणार आहेत.तत्पूर्वी देसाईगंज नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी यांनी देसाईगंज शहरातील तसेच स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानुसार, देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर यांनी प्रतिसाद देत संपूर्ण नगरसेवक तथा नगर प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी मिळून हातात झाडू घेत स्मशानभूमी परिसरात स्वच्छता केली.
बऱ्याच कालावधीपासून वैनगंगा नदीकाठावर असलेल्या शिव वैकुंठधाम या स्मशानभूमी परिसरात घाण व कचरा पसरलेला होता.मृत व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करतांना त्या परिसरात घाण व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.सदरची बाब लक्षात घेता धार्मिक सेवाभाव मनात बाळगून उपनगराध्यक्ष नरेश विठ्ठलानी यांनी स्वच्छतेबाबत उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त करताच देसाईगंज शहराच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर यांनी सर्व नगरसेवकांना या उपक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.या उपक्रमाला प्रतिसाद देत स्विकृत नगरसेवक राजू जेठानी,राजू रासेकर पाणी पुरवठा सभापती सचिन खरकाटे,आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते,शिक्षण सभापती बाळु माडुळवार,राहुल सतवाणी,विलास लोखंडे,कॉंग्रेसचे गटनेते विकास प्रधान,नगरसेविका पल्लवी मेंढे,राधिका पत्रे,भारती कुथे,लता मुळे,ज्योत्सना लुटे यांचेसह मुर्लीधर सुंदरकर,माजी नगरसेवक दिपक झरकर,आकाश अग्रवाल,चंद्रप्रकाश दूबे,सचिन वानखेडे, प्रिन्स अरोरा,कपिल बोरकर,बादल राहाटे,अमन रामटेके, अविनाश राठोड,प्रमोद येरणे  मुकेश सोनेकर,अंकुश उरकुडे,रितेश येडणे,मंगेश चहांदे यांचेसह स्वच्छता कर्मचारी व सेवाभावी नागरिकांनी उपस्थिती दर्शवून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली.देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमास कौतुकाची थाप दिली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!