- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून आज,गुरुवार ८ जानेवारी रोजी गडचिरोली पोलिस दल तथा देसाईगंज पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज शहराच्या क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले.प्रसंगी कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले व देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजय जगताप यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे,असे आवाहन करताच देसाईगंज शहरातील शेकडो युवकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.त्यांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत उपस्थित तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आगरकर,पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले,प्रेमकुमाप दांडेकर, महिला पोलिस उपनिरिक्षक कोमल माने,अनिल डेरकर,पवन नायमाने,पोलीस कर्मचारी निलेश कडव, दिनेश सोनकुसरे,दिनेश बन्सोड,राजु उराडे,कुंदन शेन्डे यांनी योगदान दिले.सदर कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष सचिन खरकाटे, कुलदीप आमले,अतुल दुणेदार, बादल रहाटे तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचेसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

