Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरबांबू कापण्याचे काम करत असतांनाच बिबट्याचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

बांबू कापण्याचे काम करत असतांनाच बिबट्याचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर-बीट परिसरात बांबू कापत असतांनाच बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवला.यात साहजू चमरू बिलठेरिया वय ६३ वर्षे,मूळ गाव रा.प्रतला, जि.मंडला,मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला असून ते अडेगाव जंगल परिसरात बांबू कटाईचे काम करीत होते.मोहर्ली वनपरिक्षेत्रातील अडेगाव गावालगतच्या कक्ष क्रमांक-१८१ मध्ये काल गुरुवारच्या सकाळी मजुरांच्या वतीने बांबू कटाई सुरू होती.सर्वजण बाबू कटाई करण्यात व्यस्त होते.अश्यातच जंगल परिसरातून आलेल्या बिबट्याने साहजू यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला.हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली,पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक)चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप एकाडे व पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिस व वनविभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा व मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविला. प्रसंगी मृतकाच्या नातेवाइकांना तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात केवळ यंदा २०२५-२६ मध्ये आतापर्यंत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ४५ जणांचा मत्यू झाला असून वाघाने ४१ जणांना,बिबट्याने दोघांना,हत्ती आणि अस्वलाने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!