Monday, July 20, 2026
Homeनागपूरबांधकाम सुरू असतांना पाण्याची टाकी कोसळली; तिघांचा मृत्यू..

बांधकाम सुरू असतांना पाण्याची टाकी कोसळली; तिघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एमआयडिसी परिसरातील अवाडा कंपनीत एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असतांनाच टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १९ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. घडलेल्या अपघातात टाकीचे बांधकाम करणारे मजूर मलब्याखाली दबल्या गेले.लागलीच परिसरातील कामगार मदतीला धावले.एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून जखमींना तातडीने बुटीबोरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सात ते आठ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एमआयडिसी परिसरात अवाडा कंपनीचे निर्माणाधिन कार्य सुरू आहे.बुट्टीबोरी येथील अवाडा ही सोलर पॅनल तयार करणारी कंपनी आहे.या कंपनीमध्ये एक टाकी तयार करण्यात येत होती.याचे काम अंतिम टप्प्यात असतांनाच टाकी कोसळली अन् अनेकजण मलब्याखाली दबले गेले.जखमी कामगारांवर बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात  प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!