Sunday, September 6, 2026
Homeनागपूरझुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाचा हल्ला.!

झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाचा हल्ला.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील झमकोली गावालगत असलेल्या जंगल परिसरात गुरे चराईसाठी घेऊन जात असलेल्या गुराख्यावर रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकाश विठ्ठल किचक वय ४५ वर्षे,रा.झमकोली, ता.भिवापूर असे जखमी गुराख्याचे नाव असून प्रकाश हे नेहमीप्रमाणे घरची आणि गावातील काही जनावरे जंगल परिसराच्या शिवारात चराईसाठी घेऊन गेले होते. सकाळच्या सुमारास जनावरे घेऊन शेताच्या दिशेने जात असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.हल्ला चढवताच प्रकाश यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. आवाजाने परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजूर हातात काठ्या घेऊन वाचविण्यासाठी धावले आणि अस्वलाला पिटाळून लावले.हल्ल्यात प्रकाश यांच्या मान,डोके व शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाली.नागरिकांनी त्यांना लगेच उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.याच शिवारात काही महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता.येथील जखमी अथवा रुग्णांना उपचारासाठी उमरेडला न्यावे लागते.रस्ता खराब असल्याने उमरेडला पोहोचण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.या काळात जखमी अथवा रुग्ण उपचाराअभावी वाटेत दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वन विभागाने या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी उपसरपंच संजय ढोक यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!