Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीआज अपघातवार; ट्रक्स पलटी ग्रामसेवकाचा मृत्यू.. -बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; वाहन...

आज अपघातवार; ट्रक्स पलटी ग्रामसेवकाचा मृत्यू.. -बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; वाहन चालक बचावला तर प्रवाशी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात आज,बुधवार १० डिसेंबरला अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पहिली घटना गडचिरोली शहरात सकाळच्या सुमारास घडली.यात ४२ वर्षीय शिक्षिका ममता धर्माजी बांबोळे यांचा मृत्यू झाला.तर दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाला आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव येथील मुख्य मार्गाच्या  वळणाजवळ दुपारी एक वाजेच्या दरम्यान साकोली डेपोची एमएच ४० वाय ५२०७ क्रमांकाची नियमित बस कुरखेडा व्हाया कोरची जात असतांना समोरून येणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाचा कच्चा माल घेऊन रायपूरला जाणारा एमएच ४० बीजी ९०५७ क्रमांकाचा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन बसचा समोररील भाग चेंदामेंदा झाला.घटना घडताच बस चालक राहुल जगबंधू वय ५६ वर्षे यांनी प्रसंगावधान साधत बसखाली उडी मारल्याने थोडक्यात बचावले.मात्र,बसमधील प्रवाशांना जखमा झाल्या.बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते.त्यातील ३ महिला जखमी झाल्या.कमलाबाई मडावी वय ५६ रा. नकटी,ता.देवरी,जि.गोंदिया या गंभीर जखमी असून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तर लता वट्टी वय २३ वर्षे रा.मसेली, ललिता भक्ता वय ३० वर्षे,रा.कोचीनारा, ता.कोरची या महिला जखमी झाल्या.
दुसराही अपघात हा कोरची तालुका मुख्यालयापासून कुरखेडा मार्गे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर घडला. चार किलोमीटर अंतरावरील बेळगाव नजीक जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रक्स(मॅक्स)पलटी झाली.यात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. टॅक्सीत १३ ते १४ प्रवासी असल्याची माहिती आहे.वाहन पलटी होताच कोरची तालुक्याच्या अल्लीटोला ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक दिलीप रामचंद्र धाकडे वय ४९ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,ते गांधीनगर येथील रहिवासी होते.एमएच २२ डी १९९० क्रमांकाची खाजगी ट्रक्स ही कोरची वरून कुरखेडा मार्गे येत असतांना सदरचा अपघात घडला.अपघातात उज्वला आदेश राऊत वय २५ वर्षे रा.मसेली या गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर
मंगलीबाई गुरुभिले वय ४५ वर्षे,रा.जामणारा,ता. कोरची, चालक व्यंकट नानाजी सीडाम वय ५२ वर्षे,रा.मालदुगी, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली अशी जखमींची नावे असून सर्वांवर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेचा तपास कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!