- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहरात भीषण अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १० डिसेंबरच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान गडचिरोली शहरातील बी-फॅशन मॉलसमोर घडली. ममता धर्माजी बांबोळे वय ४२ वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या मूळच्या पोर्ला येथील रहिवासी असून कॉम्प्लेक्स परिसराच्या आयटीआय-गोकुळ नगर बायपास रोड परिसरात आपल्या आईकडे वास्तव्यास होत्या.गडचिरोली शहराच्या कारमेल शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
माहितीनुसार,ममता बांबोळे या नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीने शाळेत जात होत्या.गडचिरोली-चंद्रपूर रोडवरील बी-फॅशन मॉलजवळ जाताच एमएच ३४ बी झेड १११३ क्रमांकाचा सिमेंट भरलेला ट्रक मार्गावरून जात असतांनाच ट्रक स्कुटीला आपटणार तोच स्कूटी स्लिप झाली.यात ममता बांबोळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला.जबर मार लागल्याने त्या मार्गावरच गडबळ्या लोळू लागल्या,पण तात्काळ त्यांच्या मदतीला कुणीही धावले नाही.बघ्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली होती.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. पण,काही वेळातच त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरासह शैक्षणिक वर्तळात हळहळ व्यक्त केली जात आहे.गडचिरोली पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक प्रसाद मिश्रा याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

