Monday, July 20, 2026
Homeगडचिरोलीआरोग्य सेविकेचा छळ करणारा तालुका आरोग्य अधिकारी निलंबित..

आरोग्य सेविकेचा छळ करणारा तालुका आरोग्य अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात एका विकृत अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून शनिवार ६ डिसेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या एका ४५ वर्षीय कंत्राटी आरोग्य सेविकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या घटनेने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.संबंधित आरोग्य सेविकेच्या पतीने दोन वर्षांपासून वेतनवाढ रोखून धरल्याचा तसेच सतत दडपशाही करून शरीरसुखाची मागणी करत छळ केल्याचा थेट आरोप केला होता.घटनेच्या दिवशी आरोग्य सेविकेने दिवसभर कर्तव्य बजावले आणि सायंकाळी ती मुलचेरा येथे घरी परतली.मात्र,ती तणावात होती.पतीने जेवण बनविले,दोघे सोबत जेवले.पतीला डुलकी लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले होते.सदरची बाब निदर्शनास येताच पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी रविवार,७ डिसेंबर रोजी रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेविकेच्या पतीशी सविस्तर संवाद साधला होता. प्रकरणी संबंधित चॅटिंगची माहिती पतीने दिली आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे; असे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी म्हटले होते.त्यानुसार,आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कंत्राटी आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ.विनोद घनश्याम म्हशाखेत्री,तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे नियोजित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे; असे डॉ.प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!