Monday, July 20, 2026
Homeगडचिरोलीआज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर घेणार दुर्गम भागातील आरोग्य सेवांचा आढावा..

आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर घेणार दुर्गम भागातील आरोग्य सेवांचा आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील अमरावती,नंदुरबार,पालघर आणि गडचिरोली या आदिवासी व अतिदुर्गम जिल्ह्यांतील आरोग्य सेवांची स्थिती,सुविधा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूरात राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत मंत्री यांनी केलेल्या जिल्हा भेटीदरम्यान दिलेल्या सुचनांवरील कार्यवाही,अनुपालन अहवाल आणि पुढील सुधारात्मक पावले या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे व आढावाही घेतला जाणार आहे. सदरची बैठक समिती सभागृह,उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय,माता कचेरी, दिक्षाभूमी परिसर,नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव,आयुक्त तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,संचालक आरोग्य सेवा मुंबई,संचालक आरोग्य सेवा पुणे,उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग,सर्व सहसंचालक,अधिक्षक अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई,उपसंचालक अकोला,ठाणे,नागपूर,सहाय्यक संचालक,राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच अमरावती,नंदुरबार,पालघर आणि गडचिरोली येथील जिल्हा शल्यचिकित्सक,आरोग्य अधिकारी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, आर.सी.एच अधिकारी,सिकलसेल समन्वयक आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!