- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या प्रेमाचा एका निर्णयाने शेवट झाल्याची घटना उघडकीस आली आहे.खरच मनापासून प्रेम करणारे कुठल्याही सीमा पार करू शकतात.हे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील घोरपड गावातील २५ वर्षीय तरुणाचे नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील दुधाळा गावातील एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते.हळूहळू दोघांमध्ये प्रेम बहरून आले.मात्र,बहरणाऱ्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.तरुणीचे लग्न जुळले,याची भनक तरुणास लागताच बुधवार १९ नोव्हेंबरच्या रात्री तरुण कुणाला काहीही न सांगता घरून प्रेयसीला भेटण्याकरिता दुधाळा येथे गेला.दोघांचीही भेट झाली आणि त्याच मध्यरात्री दोघांनीही विष प्राशन केल्याने यात घोरपड गावातील २५ वर्षीय पुनित नरेश भालावीर या तरुणाचा मृत्यू झाला,तर तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने समाजमन सुन्न झाले असून पुनीतच्या पार्थिवावर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घोरपड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisement -

