- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना गडचांदूर पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून तब्बल दोन किलो ११ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अनिल जगेराव आडे वय २२ वर्षे,रा.बैलमपूर,गडचांदूर, जि.चंद्रपूर व ईरफान सय्यद ईस्माईल वय ३० वर्षे रा.लक्ष्मी टॉकीज जवळ,गडचांदूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन्ही आरोपींवर ‘एनडीपीएस'(अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉफीक पदार्थ)कायदा १९८५ चे कलम ८ (क),२० (ब) (ii) (ब)अन्वये गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,गडचांदूर शहर पोलिसांना शहरापासून काही अंतरावर दोघेजण गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार, पोलीस पथकाने शहरातील वरझडी शेतशिवारात धाड मारून दोन तरुणांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत संशयास्पद हालचाली केल्या. परिसरात शोध घेताच पोलिसांना जवळच एका वृक्षाखाली पोपटी रंगाचे गाठोडे आढळून आले.त्याची तपासणी केली असता त्यात हिरवट रंगाची ओलसर पाने,फुले व बोंडे दिसून आली.खात्री करताच गांजा असल्याचे स्पष्ट झाले.गाठोड्यात सापडलेल्या गांजाचे वजन केले असता ज्याची किंमत २० हजार ११० रुपये असून तब्बल दोन किलो ११ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.सदरची कारवाई गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पीएसआय पंकज हेकाड, पोलीस हवालदार शितल बोरकर,नायक पोलीस अंमलदार बलवंत शर्मा,पोलीस अंमलदार प्रकाश बाजगीर,सुरज ढोले,मनोहर जाधव,साईनाथ उपरे यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

