- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परला धडक बसणार इतक्यात स्कूल बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेताच रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकल्याने बसच्या समोरील भाग तुटफुट होऊन बसमधील २२ विद्यार्थ्यांना किरकोळ जखम झाल्याची घटना आज,गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पवनी तालुक्यातील निलज फाटा नजिक घडली.बसमध्ये २२ विद्यार्थ्यांसह एक केअरटेकर असे २३ जण पवनीवरून भिवापूरच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत जात असतांना सदरचा अपघात घडला.अपघात घडताच घटनास्थळी ग्रामस्थांचा मोठा जमाव गोळा होत विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.तपासणी अंती विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.प्रकरणी स्कूल बस चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आणि २३ जण थोडक्यात बचावले.
- Advertisement -

