Friday, October 16, 2026
Homeभंडाराघरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती

घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली आहेत. जेणेकरून बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत.मात्र बांधकामासाठी वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत.

या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी क्षेत्राचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या समक्ष आपली स्थिती ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली. तसेच पीएम आवास योजनेचे दोन्ही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे पाच ब्रास वाळू मोफत देण्याची मागणी केली होती.फुके यांच्या प्रकरणाची तातडीने दखल घेत महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!