Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधन वृत्तीचे विद्यार्थी आवश्यक - डॉ.शंकर कुकरेजा - देसाईगंज...

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधन वृत्तीचे विद्यार्थी आवश्यक – डॉ.शंकर कुकरेजा – देसाईगंज आदर्श महाविद्यालयात अर्थशास्त्रीय मॉडेल्स प्रदर्शनीचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 देसाईगंज :- विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील  संशोधने  समाज व  देशाच्या  उन्नतीमध्ये  महत्वपूर्ण असतात.विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व  देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते.विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या संपादित ज्ञानाला संशोधनातुन समाजातील समस्या सोडविण्यासाठी उपयोग करावा.  अर्थशास्त्रीय मॉडेल्स प्रदर्शनीमध्ये विद्यार्थिनींनी विविध अर्थशास्त्रीय संकल्पना वर आधारित जे मॉडेल्स तयार करून प्रदर्शित केले ते खरच वाखाण्याजोगे  आहे.असे मत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी व्यक्त केले. 

आदर्श महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थशास्त्राच्या विभिन्न संकल्पनांवर आधारित विविध मॉडेल्सची प्रदर्शना आयोजित करण्यात आली होती.मॉडेल्स प्रदर्शनी मध्ये एकूण १२ मॉडेल्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यामध्ये बीए भाग १,२ व ३ या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  होता.विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये मुद्रेची उत्क्रांती, पर्यावरण हानी,ग्रामीण अर्थव्यवस्था,अर्थव्यवस्थेतील संरचनात्क बदल,बँकिंग व्यवस्था,शाश्वत शेती,वायू प्रदूषण,जल प्रदूषण,पारंपरिक ऊर्जा स्त्रोत,सोलर सिंचन व्यवस्था,एकाधीकार बाजारपेठ,केंद्रीय अर्थशास्त्रीय संकल्पनांवर  मॉडेल्स तयार करून ते प्रदर्शनासाठी ठेवले होते.संशोधक विद्यार्थी समाजाच्या समस्यांना डोळसपणे बघून त्या दुर करण्यासाठी प्रयत्नशील असतो.विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानातून संशोधक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही प्रदर्शनी भरविण्यात आली.असे मत अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.निहार बोदेले यांनी मांडले.  प्रदर्शनाला सर्व प्राध्यापक वृंद,महाविद्यालयातील विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. प्रदर्शनीमध्ये प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!