Friday, October 16, 2026
Homeपुणेअडीच लाखांची मध्यस्ती करणारा शिक्षक एसिबीच्या जाळ्यात

अडीच लाखांची मध्यस्ती करणारा शिक्षक एसिबीच्या जाळ्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी लघु पाटबंधारे विभागातील एका अभियंत्याने केली.अडीच लाखांची रक्कम एका शिक्षकाच्या माध्यमातून बारामतीतील जळाेची रस्ता येथे स्विकारली जात असताना,संबंधित दाेघे आराेपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळयात अडकले.अभियंता संदीप गाेंजारी व त्याचा साथीदार शिक्षक प्रकाश सुर्यवंशी वय-४० वर्षे असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.याप्रकरणी बारामती पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात ​​​​​आली आहे.

एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा माेबदला म्हणून,लघु पाटबंधारे खात्यातील अभियंता संदीप गाेंजारी याने अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली हाेती.तक्रारदाराला आराेपीस पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करून दाद मागितली.एसीबीच्या पथकाने माहितीची खातरजमा करुन सापळा रचून शिक्षकास अटक केली आहे. अभियंता गाेजारी याचे वतीने लाच घेण्यास आलेला शिक्षक प्रकाश सुर्यवंशी रंगेहाथ पैसे घेताना एसीबीच्या पथकास आढळून आला.ही कारवाई पुणे विभाग एसीबीचे पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे , अप्पर पाेलिस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक राम शिंदे,विरनाथ माने,कर्मचारी प्रविण तावरे,साैरभ महाशब्दे,अभिजीत राऊत यांचे पथकाने केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!