Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात साक्षीदाराला धमकाविणे दखलपात्र गुन्हा..!

आता कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात साक्षीदाराला धमकाविणे दखलपात्र गुन्हा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विविध गुन्हेगारी प्रकरणात काही गुन्हेगार आपल्यावरील गुन्हे सिद्ध होऊ नयेत,यासाठी साक्षीदाराला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धमकावून स्वतःची निर्दोष सुटका व्हावी म्हणून वेगवेगळे हतकंडे वापरत असतात.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात न्यायदानावरील विश्वास कमकुवत होतांना दिसून येतो. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे संजय कुमार आणि न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फिरवत कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात साक्षीदाराला धमकाविणे दखलपात्र गुन्हा असून पोलीस प्रशासनाने साक्षीदाराला धमकाविणाऱ्या व्यक्तीविरोधात थेट प्रथम खबरी अहवाल म्हणजेच एफआयआर नोंद करून घ्यावे,यासाठी त्यांना न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सदरचा आदेश देतांना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या ‘अनुच्छेद १९५अ’ चा अर्थ स्पष्ट केला आहे. यापूर्वी एका प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने साक्षीदाराला धमकाविले जात असेल,तर पोलिसांना थेट एफआयआर नोंदविण्याचे अधिकार नाहीत; अशा प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयाने तक्रार सादर केली पाहिजे,असा निर्णय  दिला होता.तथापि,सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फिरविला आहे.साक्षीदाराला धमकाविण्याच्या संदर्भात भारतीय दंड विधानात १९३,१९४,१९५ आणि १९६ असे इतरही अनुच्छेद आहेत,या अनुच्छेदांचा संबंध अनुछेद १९५अ याच्याशी नाही.इतर अनुच्छेदांच्या अनुसार पोलिसांना थेट कारवाई करण्याचे अधिकार नाहीत,तथापि,या विशेष अनुच्छेदाच्या अनुसार पोलीस थेट कारवाई करु शकतात,असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!