Thursday, September 3, 2026
Homeभंडाराअल्पवयीन मुलीवर अत्याचार; १५ वर्षीय मुलगी दोन महिन्याची गर्भवती.. - २२ वर्षीय...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १५ वर्षीय मुलगी दोन महिन्याची गर्भवती.. – २२ वर्षीय तरुणास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका २२ वर्षीय तरुणाने दोन महिन्यापूर्वी अभ्यासाचा बहाणा करून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावले आणि घरी कुणीही नसल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.तब्बल दोन महिन्यानंतर मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तरुणाने शासकीय रुग्णालयात नेताच प्रकरणाचे बिंग उघड झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे.प्रकरणी नेहार शरद चारमोडे वय २२ वर्षे,रा.भंडारा याच्याविरुद्ध पालांदूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-१८२/२०२५,कलम ३७६(२)(आय), ३७६(२)(एन) भारतीय दंड संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम(पॉक्सो ॲक्ट) २०१२ च्या कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.
२४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी आरोपी नेहारच्या घरी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम विचारण्यासाठी गेली होती.याच वेळेस घरात कुणीही नसल्याची संधी साधून आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला.घाबरलेल्या पिडीतेने याबाबत कुणालाही सांगितले नाही.मात्र,दोन महिन्यांपर्यंत मासिक पाळी न आल्याने आणि पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी पोहरा येथील शासकीय रुग्णालयात नेले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार,पीडितेने लाखनी पोलिस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गावंडे यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत कथन केले व जबाब नोंदवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,पीडितेचा जबाब आणि पोहरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पालांदूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीस अटक केली आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गावंडे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!