- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या आमगांव येथील ५८ वर्षीय एक इसम तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना उघडकीस आली आहे.हरिचंद्र कवळुजी हारगुळे रा.आमगांव,ता.देसाईगंज, जि.गडचिरोली असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव असून प्रकरणी कुटुंबीयांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,हरिचंद्र हारगुळे व गावनजीक परिसरातील चार ते पाच नागरिक नेत्र(डोळे) शस्त्रक्रियेसाठी शुक्रवार १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी वर्धा येथे गेले होते.वर्धेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णालयाच्या वाहनाने सर्वांना सिंदेवाही रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले.या दरम्यानच्या कालावधीपासून हरिचंद्र हारगुळे हे त्यांच्या स्वगावी परतले नसल्याने हारगुळे कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.हरिचंद्र यांच्या नेत्रांची शस्त्रक्रिया झालेली असून त्यांच्या डोळ्याला पट्टी व काळा चष्मा लावलेला आहे.सिंदेवाही रेल्वे स्थानकावरून देसाईगंज मार्गे रेल्वेने प्रवास करतांना सरळ गोंदिया वा इतर प्रवासी मार्गावर गेलेत की काय?असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.प्रकरणी कुटुंबीयांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली आहे.तत्पूर्वी हरिचंद्र हारगुळे ज्याला कुणाला आढळून आल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
- संपर्क :-9422561582,7875609800, 9405774326.
- Advertisement -

