Thursday, September 10, 2026
Homeभंडाराअवैध रेती तस्करीवर रामबाण उपाय; आता पलीकडच्या जिल्ह्यातही उभारणार चेक पोस्ट..

अवैध रेती तस्करीवर रामबाण उपाय; आता पलीकडच्या जिल्ह्यातही उभारणार चेक पोस्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गडचिरोली जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट कार्यान्वित करून अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घातला होता.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.पोलिस यंत्रणा आणि महसूल विभागाचे पथक रोज कारवाया करतांना दिसून येत आहेत.तरीही तस्करी थांबलेली नाही.नुकतेच काही दिवसांपूर्वी भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या वाहनाच्या अपघाताच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर येत जिल्हा महसूल विभागाने अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल २१ चेकपोस्ट कार्यान्वित करणार असून संपूर्ण चेकपोस्ट सीसीटीव्हीने जोडलेले असतील.त्याचे मॉनिटरिंग २४ तास जिल्हाधिकारी कार्यालयातून केले जाणार आहे. या सर्व पॉइंटवर दोन पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील एक अधिकारी असे तिघांचे पथक असेल.२४ तास ही चौकी कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यातील ज्या घाटांवरून रेतीची तस्करी होते,त्या घाटांवर बंदोबस्त लावणे अथवा मनुष्यबळ तैनात करणे शक्य नाही.रेती तस्कर संघटितपणे गुन्हा घडवितात. एवढेच नाही तर,आडमार्गाने रेतीची वाहतूक करतात. अशावेळी घाटांवर मनुष्यबळ गुंतविण्याऐवजी ज्या मार्गाने रेती जिल्ह्याबाहेर नेली जाते,त्या मार्गावरच हे चेकपोस्ट उभारले जाणार आहेत.त्यामुळे तस्करांची नाकाबंदी करणे सोईचे होईल,असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आणि महसुलाची होणारी लुट थांबविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सहकार्य करावे,असे आवाहन केले जात आहे.या मोहिमेसाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून निधीची उपलब्धता केली जाणार आहे.२१ ठिकाणी उभारले जाणारे चेक पोस्ट,सीसीटीव्ही यासह अन्य खर्चाच्या तरतुदीसाठी ही व्यवस्था केली जाणार आहे.
सावन कुमार,जिल्हाधिकारी भंडारा👇
रेती तस्करी थांबविण्यासाठी अधिकाधिक घाटांचा लिलाव या वर्षी करण्याचे नियोजन असून  महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.यामुळे रेती तस्करी कमी होऊन जिल्ह्याच्या महसुलातही भर पडेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!