Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउद्याला देसाईगंज येथे रोजगार मेळावा; तरुण-तरुणींना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी..

उद्याला देसाईगंज येथे रोजगार मेळावा; तरुण-तरुणींना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या,१५ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज(वडसा)येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यात क्वेस कॉर्प,नागपूर ही नामांकित कंपनी सहभागी होणार असून,विविध तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रांतील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
या निमित्ताने जिल्ह्यातील तरुण-तरुणींना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह स्वखर्चाने  वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया प्रत्यक्ष स्थळी पार पडणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण व नोकरीच्या संधी देण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देणे आणि उद्योग क्षेत्राशी जोडून वाढविणे हा आहे.जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी सर्व पात्र उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!