Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत  येणाऱ्या गोंडपिपरी-खेडी मार्गावर आज,सोमवार २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघे तरुण खाली कोसळून यातील एकजण जागीच ठार झाला,तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर तिसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.सारंग गंडाटे वय २६ वर्षे,रा.पेंढरी मक्ता,ता.सावली,जि.चंद्रपूर याचा जागीच मृत्यू झाला.तर प्रियांशु गंडाटे वय २३ वर्षे, रा.पेंढरी मक्ता,ता.सावली,जि.चंद्रपूर याचा मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.याशिवाय लंकेश समर्थ रा.मुंडाळा हा गंभीर जखमी झाला.तिघेही तरुण कापसाच्या फवारणीचे औषध खरेदी करून दुचाकीने गावाकडे परत जात होते. दरम्यान,गोंडपिपरी-खेडी मार्गावर एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच सारंग घटनास्थळीच मृत पावला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.तिथे उपचार सुरू असतांनाच प्रियांशुची प्राणज्योत मावळली.तर लंकेशला गंभीर मार लागल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!