- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शहरातील छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी संतोष ढेकलप्रसाद पटले यांची तीन एकर जमीन जिल्हा क्रीडा संकुलासाठी नगर परिषदेने अधिग्रहीत केली. यासाठी सन २०११-१२ मध्ये त्यांना २४ लाख ८२ हजार रुपये जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात आले.मात्र, जमिनीची किंमत कमी आखण्यात आल्याने पटले यांनी न्यायालयात धाव घेतली.यावर न्यायालयाने सन २०१७-१८ मध्ये पटले यांना आणखी ३६ लाख ३४ हजार रुपये मोबदला स्वरूपात देण्याचे आदेश नगर परिषदेला दिले.न्यायालयाच्या आदेशानंतर १५ दिवसांपूर्वी नगर परिषदेने त्यांना तीन लाख रुपये दिले. मात्र,अजूनही ३३ लाख ३४ हजार रुपये घेणे असून नगर परिषदेने रक्कम दिली नाही.अश्यातच पटले यांना न्यायालयाने जप्ती आदेश दिले.त्यानुसार त्यांनी काल सोमवारी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.यावर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी आदेशानुसार कारवाई करा,असे सांगत निघून गेले. यानंतर न्यायालयाचे बेलिफ आर.डी.सुखदेवे व त्यांचे सहकारी धर्मेश ढोबळे यांनी कारवाई सुरू करीत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची व त्यांच्या दालनातील सहा अन्य खुर्च्या तसेच तीन संगणक संच जप्तीची कारवाई केली. फिर्यादी संतोष पटले व त्यांचे धाकटे भाऊ किशोर पटले हे बेलिफसोबत नगर परिषद कार्यालयात गेले असता त्यांच्यासोबत कोर्ट एजंट राजेश सव्वालाखे यांनी दोन लाख रुपये देतो कारवाई थांबवा,अशी बोलणी केली. यावर पटले यांनी त्यांना न्यायालयात जाऊन प्रक्रिया करून घेण्यास सांगितले.त्यानुसार,सव्वालाखे न्यायालयातही गेले होते.मात्र,त्याचा काहीही फायदा झाला नाही.शेवटी जप्तीच्या कारवाईस सामोरे जावे लागले.
- Advertisement -

