- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपुर पासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या लावारी गावाजवळील शेत शिवारात गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतातील धान निंदणी करणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली होती.विद्या कैलास मसराम वय ४० वर्षे,रा.लावारी,ता.चिमूर असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभागाच्या वाहनांना घेराव घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन महिलेचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी भूमिका लावारी गावकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी रेटून धरली होती.त्यानुसार वनविभागाने घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते.वाघ वारंवार त्या भागात फिरत असल्याचे कॅमेऱ्यातून स्पष्ट झाल्यानंतर,काल शुक्रवारी घटनास्थळाजवळ पिंजरा लावण्यात आला व रात्रीच्या सुमारास वाघ पिंजऱ्यात अडकला आणि नरभक्षी वाघाचा धडकी भरवणारा प्रवास थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
- Advertisement -

