- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पूर्वी वाघ पाहण्यासाठी जंगल हुडकून काढावे लागत होते.पण,हाल्या-हाल्या वाघाचे दर्शन होत नव्हते. दर्शनासाठी व्याघ्र प्रकल्पात गेल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,काही वर्षांपासून अनेकांना वाघ, बिबट्या,अस्वल व अन्य प्राण्यांचे दर्शन सहजरीत्या होऊ लागले आहे. अश्याच प्रकारे काल शनिवारी जंगलात नाही तर आवागमन करणाऱ्या मुख्य मार्गावरच दुचाकीस्वार तरुणांच्या पुढे थेट वाघाची एंट्री झाली.भल्या मोठ्या वाघाला पाहून तीन तरुणांची काहीकाळ घाबरगुंडी झाली.तिन्ही तरुण दुचाकी घेऊन मागे सरकले आणि दूरवर जाऊन वाघ कुठे जातोय ते बघू लागले.थोड्या वेळातच वाघ जंगलाच्या दिशेने जात “थांबा अगोदर मला जाऊ द्या; नाहीतर गाठ माझ्याशी आहे” असे म्हणाला तर नसावा ना.! सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील किटाडी-अड्याळ मुख्य मार्गावरील किटाडी परिसरालगत काल,शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.किटाडी गावातील तरुण दिलेश सेलोटे,आशिष चौधरी व रोशन मराठे हे तिघेही तरुण किटाडी-अड्याळ मुख्य मार्गावरून दुचाकीने प्रवास करीत होते.किटाडी नजिक परिसरात ऐन मार्गावरच भला मोठा पट्टेदार वाघ पुढे आला.यामुळे तिघांचीही घाबरगुंडी झाली.थोड्या वेळातच वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.मात्र, काहीकाळ मार्गावरील रहदारी प्रभावित झाली होती.
- Advertisement -

