Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चार दिवसात दुसरा बळी..

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चार दिवसात दुसरा बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघाचे हल्ले संपता संपेना.मुख्यत्वे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे.नुकतेच शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी सावली तालुक्याच्या पाथरी गावातील एका ६५ वर्षीय शेतकऱ्यास वाघिणीने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच परत चार दिवसांनंतर आज,सोमवार ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुल तालुक्यात एका ६० वर्षीय महिलेस वाघाने ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना मुल तालुक्याच्या सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथे घडली असून अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने वय ६० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
अन्नपूर्णा बिलाने ही महिला नेहमी प्रमाणे आजही
पहाटेच्या सुमारास जागी झाली आणि रात्रीचे भांडे घासण्यासाठी घराच्या मागील बाजूस निघाली.मागील भाग जंगल व्याप्त असल्याने परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने घराच्या मागे असलेल्या अन्नपूर्णा बिलाने हिच्यावर अचानकपणे हल्ला चढवत तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.त्यामुळे तिने आरडाओरड करताच पती तुळशीराम झोपेतून जागा झाला आणि मदतीसाठी धावून गेला.पतीने पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न केला.प्रसंगी फॉर्म मधील नागरिक धावून गेल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला.मात्र,वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अन्नपूर्णाचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती सोमनाथ प्रकल्पाचे समन्वयक अरूण कदम यांनी वनविभागास दिली.वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!