Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजमुख्य मार्गावरील हायमास्ट लाईट करतात लीपलाप- देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

मुख्य मार्गावरील हायमास्ट लाईट करतात लीपलाप- देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- नगरपरिषद देसाईगंजतर्फे आरमोरी मार्गे नायरा पेट्रोल पंपा पासून ते कुरुड बसस्थानका पर्यंतची रस्त्यालगत लावलेली हायमास्ट लाईट गेली अनेक दिवांपासून काही बंद स्थितीत तर काही लाईटे रात्रोच्या सुमारास लीपलाप करीत असूनही देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

देसाईगंज ते आरमोरी मार्गे रात्रोच्या सुमारास सुसाट वाहने रस्त्यावरून धावली जातात.जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ देसाईगंज असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कामासाठी तालुका मुख्यालयी जात असतात.दिवसभर काम करून सायकलस्वार, दुचाकीस्वार व इतर सायंकाळी व रात्रोच्या सुमारास गावाकडे परत जात असतांना काही वाहन धारक वाहनाचे अप्पर-डीप्पर देत नसल्याने समोरील वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने येणारे समोरील वाहन कोणते व मुख्य रस्त्यावरून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.रात्रीच्या वेळेस सगळीकडे अंधारामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.अशातच रस्त्याच्या कडेला असलेले काही हायमास्ट लाईट बंद तर काही लीपलाप करीत असल्याने देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता सदर मार्गावरील हायमास्ट लाईट दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!