उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात अनेक घटकांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असते. त्या पैकी महाविद्यालयातून शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी यांची भूमिका हि महत्वाची असते.समाज,राजकारण व अर्थकारण या सर्वच क्षेत्रात जे स्थान प्राप्त करतात ते महाविद्यालयातील शिक्षणाच्या वेळी त्यांना जे बाळकडू देऊन त्यांच्या जीवनाप्रती दृष्टीकोन निर्माण केल्या जाते.त्यामुळे ते समाजात सुदृढ विचार पेरण्याचे व आपल्या कार्यातून इतरांना प्रेरित करतात.असे मौलिक विचार सहसचिव आदर्श महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशन देसाईगंजचे अशरफ खानानी यांनी व्यक्त केले.
आदर्श महाविद्यालयात आयोजित पालक,शिक्षक व माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख अतिथी स्थानावरून ते बोलत होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यत प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे सभासद प्रशांत भैय्या,माजी विद्यार्थी संघाचे संघटक प्रा.निहार बोदेले,पालक शिक्षक संघाचे संघटक प्रा.रमेश धोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
अशरफ खानानी पुढे म्हणाले की, “माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा आरसा असतो.त्यांचे विचार व कृती हे त्यांनी शिक्षण प्राप्त केलेल्या महाविद्यालयाशी जोडले जाते.माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा देशातील सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी महाविद्यालयाच्या विकासात आर्थिक व गैर आर्थिक स्वरुपात हातभार लावावा.त्यामुळे महविद्यालयात शिक्षण प्राप्त करणारी पिढी योग्य दिशेन भावी दिशेने वाटचाल करू शकेल.” मेळाव्याचे अध्यक्ष डॉ.शंकर कुकरेजा यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम जोपासावेत; असे आवहान केले.यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील नवीन सोई सुविधा व नवीन अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत अवगत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माजी विद्यार्थी संघाचे संघटक प्रा.निहार बोदेले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.रमेश धोटे यांनी मानले. मेळाव्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, माजी विद्यार्थी व पालक बहुसंखेने उपस्थित होते.