Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरमाऊली ओरडत राहिली अन् चिमुकला गटांगळ्या खात क्षणात दिसेनासा झाला; आईच्या डोळ्यादेखत...

माऊली ओरडत राहिली अन् चिमुकला गटांगळ्या खात क्षणात दिसेनासा झाला; आईच्या डोळ्यादेखत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-परमेश्वराची किमयाच न्यारी.एकीकडे मानवाला पृथ्वी तलावावर काहीतरी चांगले कार्य करून ये..म्हणून पाठवतो.तर दुसरीकडे दुःखाचे डोंगर उभे करून सोडतो.आपण ज्याचा मनात कधीही विचारच केला नसेल,अशी एखादी घटना अचानकपणे घडत असते आणि सर्वत्र उभा येऊन ठाकतो,तो काळोख.अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे.घटनेत माऊली आपल्या १२ वर्षीय मुलाला कुणीतरी वाचवा हो..! अशी काळीज फाटल्यागत आर्त हाक देत राहिली अन् चिमुकला गटांगळ्या खात आईच्या डोळ्या देखत दिसेनासा झाला आणि नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.सदरची घटना काल,बुधवारी सकाळच्या सुमारास घडली असून घटनेत समीर मोहन वरखडवार रा.खातगाव,ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.तो इयत्ता सहावीत शिकत होता.घटनेच्या दिवशी आई आणि मुलगा सिंदेवाही तालुक्याच्या खातगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या उमा नदी पात्रावर गेले होते.मुलाची आई नदीवर कपडे धुत असतांना मुलगा जवळच पाण्यात खेळत होता.आई कपडे धुण्यात व्यस्त असतांनाच मुलगा खेळता-खेळता खोल पाण्यात गेला. खोल पाण्यात जाताच गटांगळ्या खाऊ लागला.मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड करून धाव घेतली.पण,तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाला.घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवारसह पथक दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह  शवविच्छेदकरिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात  पाठविले.घटनेने आईच्या मनावर मोठा आघात करून सोडला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!