Thursday, August 27, 2026
Homeभंडाराकाय सांगता..? एकाच गावातील चौघे रेती तस्करी प्रकरणात तडीपार..!

काय सांगता..? एकाच गावातील चौघे रेती तस्करी प्रकरणात तडीपार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात रेती तस्करीने उच्छाद मांडलेला असतांना एक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले होते.अश्यातच आता
अवैध रेतीच्या व्यवसायातून संघटित गुन्हेगारी करू पाहणाऱ्या आणि परिसरात दहशत पसरविणाऱ्या एकाच गावातील चार रेती तस्करांना पोलिसांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.एकाच गावातील चौघांवर रेती तस्करी प्रकरणात तडीपार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चारगाव येथील पोलिसांच्या नोंदीवर असलेले रेतीची तस्करी करणारे गजानन ताराचंद मेश्राम,रवींद्र गुलाब ढबाले,नानाजी लक्ष्मण माहुले आणि शोभराम नानाजी माहुले या चौघांचा समावेश आहे.हे चौघेही चारगाव (ता.मोहाडी) येथील रहिवासी आहेत.मोहाडीच्या पोलीस स्टेशन प्रभारींनी जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली या चारही जणांविरुद्ध असलेल्या गुन्हेगारी रेकॉर्डनुसार त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार केला.तो तुमसर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवून जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर आणि संबंधित ठाणेदारांनी सदरची कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!