Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरआरमोरी तालुक्यात तडीपाराचा आदेश असलेल्या गुन्हेगाराने सख्ख्या भावाची गोडी झाडून केली हत्या..

आरमोरी तालुक्यात तडीपाराचा आदेश असलेल्या गुन्हेगाराने सख्ख्या भावाची गोडी झाडून केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-लहान भाऊ व मोठा भाऊ एकाच मार्गावर पाऊलावर-पाऊल ठेवत जीवन जगू लागले.दोन सख्खे भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचे.दोन्ही भावांवर चंद्रपूरसह इतरही जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल झालेत.त्यानुसार लहान भावाला गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात तडीपाराचा आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला होता.अशातच मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून दोन भावात वाद सुरू होता.परत काल,बुधवार ३० जुलैच्या सायंकाळी दोघात पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावाला बंदुकीतून गोळी झाडून जागीच ठार केल्याची घटना चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ परिसरातील जुनोना
मार्गावरील विक्तुबाबा मंदिराच्या मागील परिसरात रात्री साडे सातच्या सुमारास घडली.बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.बुद्दासिंग टाक वय ५० वर्षे,रा. जुनोना असे हत्या झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.तर लहान भाऊ सोनूसिंग टाक हा घटनेनंतर फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंद्रपूरचे एसपी सुदर्शन मुम्मका,अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर करकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आणि रामनगरचे निरीक्षक आसिफ राजा यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.आरोपी सोनूसिंग टाक अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!