Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरटँकर व पिकअपची समोरासमोर धडक; एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी..

टँकर व पिकअपची समोरासमोर धडक; एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वणीहून चिमूरकडे साहित्य आणण्यासाठी जाणाऱ्या पिकअप वाहनाला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या टँकर वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने पिकअप वाहनातील एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी पहाटेच्या सुमारास वरोरा-चिमूर मार्गावरील रान तळोधी गावाजवळ घडली.यात ५७ वर्षीय दिलीप नारायण कोरपेनवार हे जागीच ठार झाले.तर गणेश गजानन डोहे वय २५ वर्षे,गौरव हनुमान भोसले वय १९ वर्षे अशी गंभीर जखमिंची नावे असून मृतक कोरपेनवार नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे.
दिलीप कोरपेनवार,गणेश व गौरव हे तिघेही वणीहून चिमूरकडे एमएच ४९-४४३१ क्रमांकाच्या पिकअपने
साहित्य आणण्यासाठी निघाले होते.अश्यातच वरोरा-चिमूर मार्गावरील रान तळोधी गावाजवळ पिकअप येताच एक भरधाव वेगाने टँकर वाहन समोरून आला आणि जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,तिघांपैकी दिलीप कोरपेनवार यांना जबर मार लागला.घटना घडताच टँकर वाहनाचा चालक
घटनास्थळावरून फरार झाला.घटना गावाजवळचीच असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,अपघात इतका भीषण होता की,अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते.अश्यातच रुग्णालयात दाखल करताच दिलीप कोरपेनवार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले व दोन्ही जखमींवर उपचार सुरू केले. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून फरार टँकर वाहनाचा चालकाचा शोध सुरू केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!