Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पाऊस ठोकणार धूम..!

आजपासून पाऊस ठोकणार धूम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यापूर्वी विदर्भातील पाच जिल्ह्यात  ६ जुलै ते ९ जुलै दरम्यान पावसाने जो जोर धरला तो शेवटी पूर येईपर्यंत सोडलेला नव्हता.तेव्हापासून पावसाने दडी मारल्याने बऱ्यापैकी शेतीची कामे खोळंबली आहेत. अश्यातच आता हवामान खात्याकडून पावसाची एंट्री होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज,सोमवार २१ जुलै पासून ते २३ जुलै या काळात विदर्भातील आठ जिल्ह्यांत पाऊस धूम ठोकणार आहे.सध्या स्थितीत पाऊस अधूनमधून जिकडे पडला तिकडेच पडत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चांगला पाऊस पडण्याची वाट पाहत आहे.ज्यावेळी पावसाची अपेक्षा असते, अश्यावेळी पाऊस पडत नाही तर भलत्याच वेळी पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान करून सोडते. यापूर्वी पावसाने धुमाकूळ घातल्याने गडचिरोली,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पाऊस पडतो तो शेतकऱ्यांचे नुकसान करूनच सोडतो.त्यामुळे शेतकऱ्यांची करावे तरी काय?असा प्रश्न निर्माण झाला असतांनाच आता शेतकरी बांधव पाऊस पडण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!