Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजकलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; देसाईगंज नगरीत होणार सुसज्ज नाट्यगृह.. - आमदार रामदास...

कलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; देसाईगंज नगरीत होणार सुसज्ज नाट्यगृह.. – आमदार रामदास मसरामांच्या प्रयत्नांना यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज झाडीपट्टी नाट्यरंगभूमीची नाटके जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात नावारूपास आलेली आहेत.देसाईगंज झाडीपट्टी नाट्यकलेचा समृद्ध वारसा असून,येथे अनेक उत्साही आणि गुणी कलावंत कलेचे सादरीकरण करीत असतात.या कलावंतांकडून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण मोठ्या प्रमाणावर केले जाते.गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती १९८२ मध्ये झाली असली तरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही.शालेय विद्यार्थी,रंगकर्मी आणि झाडीपट्टीतील कलावंतांना एक हक्काचे  व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज,सोमवार १४ जुलै रोजी मंत्रालयात जाऊन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत देसाईगंज शहरात आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.त्यानुसार मंत्री शेलार यांनी नाट्यगृह उभारणीसाठी तात्काळ ५० टक्के निधी ही सांस्कृतिक विभागाकडून वितरीत करण्यात येणार आहे.तर उर्वरित ५० टक्के निधी ही नगर विकास विभागातर्फे उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केल्याने लवकरच देसाईगंज नगरीत आधुनिक तथा सर्व सुविधांयुक्त सुसज्ज असे नाट्यगृह पहावयास मिळणार आहे.यामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एकप्रकारे हक्काचा मंच  उपलब्ध होणार आहे.यातून आमदार मसराम यांची प्रयत्नांतून पराकाष्ठा आणि ‘केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे’,या म्हणी प्रमाणे सर्वसामान्य जनतेची कळकळ लक्षात येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!