- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-नेहमी प्रमाणे दोघेही कामावर गेले होते. काम करून शहरात पोहचले.तिथून घरी जाण्यासाठी दोघेही पायी जात असतांनाच पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहने दोघांनाही जोरात धडक दिली.धडक बसताच एकजण जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास साकोली शहराच्या डोये वेल्डिंगजवळ घडली. ३७ वर्षीय पंकज रामू राऊत असे मृताचे तर ३१ वर्षीय अविनाश हेमराज शहारे वय ३१ वर्षे, दोघेही रा.तलाव वॉर्ड,साकोली असे जखमीचे नाव आहे.
माहितीनुसार,पंकज व अविनाश दोघेही साकोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथे कामावर गेले होते.काम झाल्यानंतर दोघेही ऑटोने शहराकडे परत येत होते.ऑटो चालकाने बोदरा रोडवर सर्व प्रवाशांना उतरवले.त्यानंतर पंकज राऊत व अविनाश शहारे हे दोघे पायी चालत आपल्या घरी जात होते.तितक्यात डोये वेल्डिंग दुकान नजीक पाठीमागून आलेल्या वाहने दोघांनाही जोरात धडक दिली.यात पंकज राऊत जागीच ठार झाला. तर अविनाश शहारे हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
- लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी काळाचा घाला👇
मयत पंकज राऊतचा ज्या दिवशी अपघात घडला, त्याच दिवशी लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता. म्हणजेच मागील वर्षी बरोबर १२ जुलै २०२४ ला तिरोडा तालुक्यातील मानपुरी येथील तरुणीशी विवाह झाला होता.मात्र,नियतीच्या मनात वेगळेच असल्याने नेमका त्याच दिवशी अपघात घडला.आज,रविवार १३ जुलै रोजी पंकजचा अंत्यसंस्कार पार पडला.
- Advertisement -

