Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ..!

जंगल परिसरात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.जंगलाचा राजा म्हणविल्या जाणाऱ्या वाघांच्या मृत्यूने वन विभाग अलर्ट मोडवर असला तरीही मृत्यू रोखण्यात अपयशी ठरू लागल्याचे चित्र आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवनपरिक्षेत्र कार्यालय अंर्तगत रत्नापूर बीटातील सरांडी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-४५/६०९ मधील रामकृष्ण कावळे यांचे शेताजवळ जंगलात एक वाघ काल मंगळवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.सदरचा वाघ हा नर असून १६ वर्षे वयाचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती वन विभागास मिळताच घटनास्थळी पंचनामासाठी सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी अंजली बोरीवार, नवरगावचे क्षेत्र सहाय्यक एस.एन.उसेंडी, सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले,रत्नापूरचे वनरक्षक ओमप्रकाश चहांदे,नवरगावचे वनरक्षक माधुरी सुरपाम,वनरक्षक नितेश शहारे,स्वाँब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर,वन रक्षक, वनमजूर वन कर्मचारी मोठ्या संस्थेने उपस्थित झाले.पंचनामा दरम्यान,मृत वाघाचे सर्व अवयव कायम असल्याचे दिसून आले व वाघाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.त्यानुसार मृत वाघास शवविच्छेदनसाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.शवविच्छेदनानंतरच वाघाचे मृत्यू कशामुळे झाले,हे कळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!