- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सुरक्षारक्षकाच्या हत्येचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच ही हत्या केली.भंगाराच्या वस्तू विकण्याच्या वादातून ही हत्या झाली.आरोपीला पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून अटक केली आहे.जवळपास २०० सीसीटीव्हीच्या फुटेज तपासणीनंतर आरोपी पोलिसांना गवसला.
नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाठोडा रिंग रोडवरील दानिश ताजी स्क्रैप सेंटरमध्ये १४ जून रोजी पहाटे ही हत्या झाली.६० वर्षीय मृत व्यक्तीचे नाव अब्दुल रहीम शेख हुसेन होते व ते त्या दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते.अब्दुल झोपेत असतांना आरोपीने गाडीतून येऊन त्यांच्या डोक्यावर लाकडी काठीने अनेक वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.उपचार सुरू असतांना दोन दिवसांनी
त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी सुरक्षारक्षकाच्या गणवेशात दिसला आणि या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तो एलएडी चौकातील एका अपार्टमेंटमध्ये गाडीतून खाली उतरून तेथून पळून जातांना दिसला.हा तरुण २४ वर्षीय आकाश नारनवरे असल्याची बाब समोर आली.पोलिसांनी त्याला तिरोडा येथून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याचा एक साथीदारदेखील या कृत्यात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.आरोपी आकाशचा भंगार दुकान मालकाशी पैशांवरून वाद सुरू होता.आरोपी चोरीचा माल भंगार दुकानाच्या मालकाला विकत असे.आरोपी बराच काळापासून थकबाकीची मागणी करीत होता.या वादातून आरोपीने ही हत्या केली.आरोपी अलर्ट सिक्युरिटी कंपनीत नोकरीला होता.त्या कंपनीकडे सुरक्षा एजन्सी चालवण्यासाठी कोणतीही नोंदणी नाही. संबंधित सुरक्षा एजन्सी मालकाविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. आरोपी आकाशवर यापूर्वी खून,चोरी,असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.तो जामिनावर सुटल्यानंतर केवळ ७ महिन्यांपूर्वीच नागपूरला आला होता आणि नागपुरात तो सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता.
- Advertisement -

