Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरबोलणे बंद केले म्हणून व्हॉट्सॲप,इन्स्टाग्रामवर केली बदनामी..

बोलणे बंद केले म्हणून व्हॉट्सॲप,इन्स्टाग्रामवर केली बदनामी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आई सोबत नातेवाईकांच्या गावी गेलेली विवाहिता एका तरुणाच्या प्रेमात पडली.प्रेमात तर पडली मात्र,सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीस कारणीभूत ठरली असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी उघडकीस आली.प्रकरणी बल्लारपूर शहरातील एका विवाहित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अक्षय श्यामराव ठेंगे वय २९ वर्षे,रा.सुरपिपरी,जि.परभणी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.बल्लारपूर शहरातील एका कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेच्या आईचे परभणी जिल्ह्यातील सुरपिपरी गावात नातेवाईक आहेत.दोन वर्षांपूर्वी विवाहित महिला तिच्या आईसोबत परभणी जिल्ह्यातील सुरपिपरी गावी गेली होती,त्यावेळी तिची भेट अक्षय ठेंगे सोबत झाली,मैत्री झाली आणि प्रेम झाले.महिलेने त्याला रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल फोन आणि सिम दिले होते.त्या नंबरवरून अक्षय अनेकदा विवाहित महिलेशी बोलायचा.काही दिवसांनंतर तो व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करू लागला.मात्र, विवाहितेने त्याला फक्त कॉल करण्यास सांगितले. त्यानंतरही तो तिला वारंवार व्हिडीओ कॉलवर बोलण्यास भाग पाडत होता.यादरम्यान,त्याने विवाहितेला तिचे काही फोटो दाखवण्यास सांगून  फोटो दाखवण्यास भाग पाडले.त्यानंतर महिलेचे फोटो आणि व्हिडीओ बनविला.हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने आरोपीशी बोलणे बंद केले.याचा राग मनात धरून त्याने मोबाइलवरून व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सुरू केले आणि महिलेच्या नावाने घेतलेल्या सिमच्या माध्यमातून आरोपीने महिलेचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवर अपलोड करून पती व नातेवाईकांना व्हायरल करून बदनामी केली.त्यामुळे महिलेने बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.या आधारे पोलिसांनी आरोपी अक्षय ठेंगे याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७,६७ (अ),भादंवि कलम ३५२,३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!