Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात तांदूळ गोदामावर छापा; निकृष्ट दर्जाचा तांदूळ देसाईगंजात होणार होता दाखल..

चंद्रपुरात तांदूळ गोदामावर छापा; निकृष्ट दर्जाचा तांदूळ देसाईगंजात होणार होता दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला चांगला तांदूळ काही राईसमिल मालक खुल्या बाजारात विक्री करून त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासनाला पुरवठा करतात.हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित केला जात असल्याचा प्रकार लक्षात येताच पोलीस यंत्रणा अश्यांच्या मागावर होती.त्यानुसार चंद्रपूरमध्ये स्वस्त धान्य दुकानांतील तांदळाची तस्करी करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे.पोलिसांनी गोदामावर छापा टाकत कारवाई केली असून तांदूळ जप्त करीत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.चंद्रपुरात बिनबागेट परिसरातील ताज एंटरप्रायझेसच्या गोदामावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी छापा टाकत कारवाई केली आहे.या कारवाईत १३ टन तांदूळ जप्त केला असून ज्याची किंमत सुमारे ३ लाख ९० हजार रुपये आहे.हा तांदूळ देसाईगंज (वडसा)येथे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.अर्थात रेशनच्या तांदळाचा सुरु असलेला काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये शासकीय योजनेअंतर्गत अल्पदरात तांदूळ मिळतो.चांगला तांदूळ बाजारात विक्री करायचा आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ गोर-गरिबांच्या माथी मारायचा,असा गोरखधंदा अनेकांनी सुरू केला असल्याने एक दिवस गोर गरिबांची अश्यांना हाय लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!