Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरगडचिरोली सोडून चंद्रपुरात गेले गांजा विकायला; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या..

गडचिरोली सोडून चंद्रपुरात गेले गांजा विकायला; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोली असो वा कोणतेही शहर असो, गांजाची विक्री करणे म्हणजे गुन्ह्यात प्रत्यक्ष कृती करून एखाद्याच्या जीवनाशी खेळणे होय.गांजा सेवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसलेले दिसून येतात.गांजाची नशा इतकी खतरनाक मानली जाते की,एकदा सेवन केलेला व्यक्ती दोन दिवस उठत नसतो.अश्यातच गडचिरोली सोडून चंद्रपुरात गांजाची विक्री करतांना दोघांना चंद्रपूरच्या रामनगर गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकून त्यांच्याकडून १ किलो ७८१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख चार हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अजित रतन रॉय वय ३८ वर्षे,सत्यजित गौरंग मंडल वय २९ वर्षे दोघेही रा.उदयनगर,ता.मुलचेरा, जि.गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील तरुण चंद्रपुरात गांजा विक्रीच्या अनुषंगाने फिरत असल्याची माहिती रामनगर येथील गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिस स्टेशनमधील पथकाने सापळा रचून गडचिरोली रोडवरील डॉ. वरगंटीवार यांच्या हॉस्पिटलसमोरील मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली.यावेळी दोघेजण एका प्लॉस्टिक पिशवीत गांजाच्या झाडाची पाने,फुले,बोंडे व बिया एकूण १ किलो ७८१ ग्रॅम बाळगून असल्याचे आढळून आले.त्या दोघांकडून गांजासह १ लाख चार हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख,एपीआय देवाजी नरोटे,हनुमान उगले,जितेंद्र आकरे,आनंद खरात,सचिन गुरनुले,पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!