- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणाऱ्या कोंढाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळी यांचा नुकताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास मसराम,गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्या कांबळी ह्या नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहतात,त्या अलर्ट इंडिया मुंबई या संस्थेच्या माध्यमातून समाजातील कुष्ठ रुग्णांना सेवा,सुविधा देऊन त्यांचे अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी पुरेपुर मदत करतात.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.विद्या कांबळी यांनी आजतागायत बरेच कुष्ठ रुग्णांना व समाजातील गोर-गरीब,सर्वसामान्य गरजु लोकांना संजय गांधी,श्रावणबाळ योजना व इतर अश्या अनेक शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या सामाजिक कार्यांची दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास मसराम,गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडलेल्या सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या स्थापनादिनी सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा तुळशी ग्रामपंचायत सरपंच चक्रधर नाकाडे,अवार्ड संस्थेचे संचालक गुणवंत वैदये,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी गहाणे,कुष्ठांतेय अधिकार मचांचे सदस्य लतीफ शेख,कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.दिनकर संदोकर, आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे चिखली,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष माहादेव चौधरी,मिलिंद बारशिंगे,श्रावण हांडेकर, नारायण उरकुडे यांचेसह अलर्ट इंडिया संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कुष्ठांतेय बंधु भगिनी उपस्थित होते.
- Advertisement -

