Thursday, August 27, 2026
Homeमुंबईधान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार मसराम मंत्रालयात..

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार मसराम मंत्रालयात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार  रामदास मसराम यांनी आज,बुधवार २८ मे रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा केली.त्यांनी विशेषतः शेतकऱ्यांच्या ई-पिक नोंदणी प्रक्रिया,धान खरेदीचे सुलभ व पारदर्शक नियोजन, तसेच शेतमालाच्या साठवणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीच्या विषयावर सचिव रंजना सारंग यांच्याशी सकारात्मक संवाद साधला.या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.नव्या राईस मिल स्थापनेचा प्रस्ताव,तसेच धान साठवण्यासाठी आधुनिक व सुसज्ज गोदाम इमारतींचे बांधकाम करण्याची मागणी आमदार रामदास मसराम यांनी यावेळी स्पष्टपणे मांडली.शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी व कृषी विकासासाठी हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सारंग यांनी दिले.मसराम यांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून,या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!