Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरविद्युत तारांना स्पर्श होऊन आठ जनावरे दगावली..

विद्युत तारांना स्पर्श होऊन आठ जनावरे दगावली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.अश्यातच शेतातील झाडे तसेच विद्युत खांब कोसळू लागले आहेत.त्यातच आज,शनिवार २४ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील उसेगाव येथील काही शेतकरी लगतच्या शेतशिवारात सकाळच्या सुमारास जनावरे चारायला घेऊन गेले होते.शिवारात जनावरे चरत असतांना दुपारच्या सुमारास उध्दव रोहणकर यांच्या शेतात विद्युत खांबाचे तार तुटलेले होते.दरम्यान,जनावरे चरत जात असताना त्यांचा जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाला.यामध्ये विद्युत शॉक लागून आठ जनावरे दगावली.यामध्ये ६ बैल व २ गायींचा समावेश आहे.सदर घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पपंचनामा केला.ऐन शेतीच्या हंगामाच्या वेळेसच शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागल्याने वीज वितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!