Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरदोघांत शाब्दिक वाद झाला आणि गंमत म्हणून ओढणी गळ्याला गुंडाळली.. - फास...

दोघांत शाब्दिक वाद झाला आणि गंमत म्हणून ओढणी गळ्याला गुंडाळली.. – फास आवळला अन् २१ वर्षीय प्रियकराचा जीवच गेला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-प्रेम म्हटले तर रुसवे,फुगवे आलेच.नंतर मात्र जैसे थे होतच असते.प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात  शाब्दिक वाद होतच राहतात.अश्यातच शाब्दिक वादात मजाक म्हणजेच गंमत करणे एका २१ वर्षीय प्रियकराला चांगलेच महागात पडले आहे.दोघांत शाब्दिक वाद झाला आणि गंमत म्हणून प्रियकराने  प्रेयसीकडील ओढणी स्वतःच्या गळ्याला गुंडाळली आणि जवळच असलेल्या झाडाला बांधून मरतो म्हणून लोंबकळला असता फास आवळला अन् २१ वर्षीय प्रियकराचा जीवच गेल्याची घटना काल, मंगळवार २० मे च्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर-नेरी रोडवरील भूमी इम्पायर लेआउट मध्ये घडली.प्रितम वाकडे वय २१ वर्षे रा.पेंडकेपार,ता.उमरेड,जि.नागपूर असे ओढणीने गळफास लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा काल मंगळवारी पेपर होता.पेपर असल्याने तरुणी आणि तिचा प्रियकर एकत्र भेटले.तरुणी ही चिमूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.तरुणीचा गाव चिमूर शहरापासून १८ किलोमिटर अंतरावर आहे.परीक्षा देण्यासाठी ती चिमुरातील राष्ट्रसंत महाविद्यालय येथे गेली होती.तत्पूर्वी दोघांनी मिळून एका हॉटेलात नाश्ता केला.ती पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. सायंकाळी पेपर झाल्यानंतर पुन्हा दोघेही भेटले. यानंतर एकांत मिळावा म्हणून नेरी रोडवरील भूमी इम्पायर लेआऊटमध्ये गेले.दरम्यान,दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद झाला.गंमत म्हणून प्रितमने लिंबाच्या झाडाला ओढणीने गळफास लावला.फास गळ्याभोवती आवळला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.प्रेयसीने प्रितमला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र तिचे प्रयत्न निष्फळ ठरले.तिनेच घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी चिमूर पोलिसांना कळविले.ठाणेदार संतोष बाकल,सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर,विलास निमगडे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करीत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.पण गंमत म्हणून केलेली युक्ती तरुणाच्या जीवावर बेतली.मयत तरुण हा तरुणीचा मामेभाऊ होता.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!