Monday, June 29, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आता बळींची संख्या झाली सहा..

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आता बळींची संख्या झाली सहा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढू लागलेत.अवघ्या पाच दिवसांत वाघांच्या हल्ल्यात सहा महिलांचा मृत्यू झाला आहे.शनिवार १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे तेंदू पाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या शुभांगी मनोज चौधरी,कांता बुधा चौधरी,रेखा शालिक शेंडे या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.तर रविवारी ११ मे रोजी सकाळच्या सुमारास मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील नागाळा बिटात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे रा.नागाळा हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.परत सोमवार १२ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील कक्ष क्रमांक- ७९३ मध्ये ३० वर्षीय भूमिका दिपक भेंडारे,रा.भादुर्णा,ता.मूल,जि.चंद्रपूर हिच्यावर जंगलात तेंदूपाने तोडत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले होते.अश्यातच आज,बुधवार १४ मे रोजी वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा बळी गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र. ८६२ मध्ये घडली.कचराबाई अरुण भरडे वय ५४ वर्षे रा.करबडा, ता.मूल असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.महिला ही आज बुधवारी तेंदूपाने तोडण्यासाठी सकाळच्या सुमारास जंगलात गेली होती.तेंदूपाने तोडत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. हल्ला करताच ती ओरडू लागल्याने जवळच पाने तोडत असलेल्या पतीने धाव घेतली असता वाघाने महिलेला जबड्यात पकडुन जंगलात फरफटत नेले. घटनेची माहिती गावकऱ्यांना देताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.अश्यातच घटनेमुळे काहीकाळ गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरण सेवा’ उपक्रम.. – ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे करण्यात येणार मालिश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम...

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!