Monday, June 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभाला फेक खेळाडू नीरज चोप्राची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती..

भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक,सिल्व्हर पदक तसेच देशतांर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रीडा जगतात विविध पदक विजेता भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची आज,बुधवार १४ मे रोजी देशाच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली.भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन १९४८ च्या पॅरा-३१ नुसार नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात सहभागी करुन घेण्यात आले आहे.नीरज चोप्राने भाला फेक( जेवलिन थ्रो)क्रीडा प्रकारात भारतासाठी २०२१ च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक आणि २०२४ च्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत सिल्व्हर पदक जिंकले आहे.यापूर्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते.सन २०१६ साली ते नायब सुभेदार पदावर भारतीय सैन दलात भरती झाले होते.आता त्यांना बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनले आहेत.नीरज चोप्राच्या अगोदरही काही खेळाडू टेरिटोरियल आर्मीचे घटक आहेत,त्यामध्ये क्रिकेट टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही टेरिटोरियल आर्मीत लेफ्टनंट कर्नल आहे.विशेष म्हणजे,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी वा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ खेळणाऱ्या क्रीडा खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते.त्यानुसार कुणाची थेट नियुक्ती तर काहींना पात्रतेनुसार बढती मिळत असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्गावरील वाहतूक आणखी ११ दिवस राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९(रेल्वे बोगदा अंडरपास)येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली...

३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या चोरगाव परिसरात उघडकीस आली.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "माझा गाव...माझी शाळा...माझी जबाबदारी" या संकल्पनेतून देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,सोमवार २९ जून रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!